ताज्या घडामोडी :

"रात्र दुःख आणि कविता" हा नविन कवितासंग्रह प्रकाशित ! लोकसत्ता चतुरंग मध्ये पंधरवड्याला लेखमाला लढा, चळवळी, आंदोलनं

अंजली कुलकर्णी - कवयित्री, लेखिका आणि तेवढीच संवेदनशील कार्यकर्ती ! 'कविता' हे त्यांचं पाहिलं प्रेम असलं तरी ललित लेखनामधेही ह्यांचा हातखंडा. कवितासंग्रह, ललित लेखसंग्रह, अनुवादित, संपादित आणि वैचारिक असे वैविध्यपूर्ण साहित्य प्रकाशित ! महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट काव्यनिर्मितीच्या पुरस्कारां बरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, ना. सी. फडके प्रतिष्ठान आणि अनेक पुरस्कारांच्या मानकरी !

लेखनाबरोबरच १९७५ पासून आजतागायत विविध पुरोगामी सामाजिक चळवळींत (युवक क्रांती दल, माध्यम, स्त्री आधार केंद्र) अंजलीताईंचा सहभाग आहे.

'शब्दमित्र' ही लेखक, वाचक, प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत या सगळ्यांना जोडणारी एक साहित्यिक चळवळ म्हणून १९९६ सालापासून कार्यरत आहे. अंजली कुलकर्णी 'शब्दमित्र'च्या संस्थापक अध्यक्ष आहेत.

निवडक साहित्य वाचण्यासाठी ...

मान्यवरांचे अभिप्राय

  • "संबद्ध" हा काव्यसंग्रह म्हणजे "व्याकुळतेचे अलवार आविष्करण" - प्रा. डॉ. वसंत बिरादार

  • "संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया" ह्या ललितलेख संग्रहाबद्दल आसावरी काकडे, रुपाली शिंदे, शंकर सारडा ह्यांचे अभिप्राय

  • रा. ग. जाधव, अनुराधा पोतदार यांनी केलेले "मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा" ह्या काव्यसंग्रहाचे परीक्षण

  • "बदलत गेलेली सही", परीक्षण - प्रा. सुहासिनी किर्तिकर

सविस्तर वाचा ...